बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी काल PWD (आरोग्य विभाग) आणि बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (BIMS) अधिकाऱ्यांशी बेळगाव येथील मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल (MCH) पायाभरणीसंदर्भात समन्वय बैठक घेतली.
दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने शहरात माता व बाल संगोपन रुग्णालय स्थापन करण्याची योजना आखली आहे.त्यानुसार आमदार बेनके यांनी BIMS आणि PWD विभागाच्या अधिकार्यांना बेळगाव येथील माता व बाल संगोपन रुग्णालयाचे बांधकाम कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच BIMSच्या आवारात प्रस्तावित ट्रॉमा सेंटरसाठी जागा वाटप करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.यावेळी BIMS संचालक डॉ. विवेक, BIMS MS डॉ. अण्णासाहेब पाटील, BIMS CAO बल्लारी , PWD (आरोग्य) AEE पेडणेकर आणि संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते.