बारा वर्षाच्या चिमुकली झेंडावंदन करून घरी परत येत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून तिला जखमी केले आहे. जवळपास दहा कुत्र्यांनी एकत्रित येत तिच्यावर हल्ला केल्याने तिच्या डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली आहे.त्यातच त्यांनी तिला फरफटत नेल्याने ती आणखीन जखमी झाली आहे.
लक्ष्मी रामाप्पा नाईक वय बारा राहणार काकती असे भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविलेल्या चिमुकलेचे नाव नाव आहे.
सदर चिमुकलीला भटक्या कुत्र्यांनी फरफटत नेत असताना येथील गावातील रहिवासी असलेल्या संजू धोनजी याच्या दृष्टीस ही बाब निदर्शनास येताच त्यांनी धाडसाने या चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून बचावले. आणि तिला पुढील उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले.