शामरजन बहुउद्देशीय फॉउंडेशन मुंबई येथील राष्ट्रीय संस्कृता संमेलन बेळगाव यांच्यावतीने देण्यात येणारा भारत कर्तव्यम समाज भूषण पुरस्कार दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे गणित विषयाचे शिक्षक व विद्यार्थीप्रिय, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले बसवंत चिगरे सराना प्रदान करण्यात आला आहे.
मंगळवार (ता. १६) रोजी बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिरात पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. रवीद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. चिगरे सराना या पुरस्काने सन्मानीत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील नवोउपक्रमात सरांचे मोठे योगदान आहे. सामान्यज्ञान परीक्षेत त्यांचे शेकडो विद्यार्थी चमकले आहेत.दि न्यू इंग्लिश स्कूलचे गणित विषयाचे तज्ज्ञ अध्यापक*,
संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, किर्तनकार, विद्यार्थी प्रिय, सेमी इंग्रजी माध्यमाचा गणित विषयाचा सलग चौदा वर्षे शंभर टक्के निकाल लावून विक्रम करणारे स्पष्टोक्ते , शांत, संयमी, उत्कृष्ट ढोलकीपट्टू, भजनसम्राट, प्रवचनकार चंदगड, आजरा व गडहिंग्लज भागात मुलांचे लेझिम पथक ट्रेनर म्हणून नावलौकिक मिळवणारे बसवंत रेमाण्णा चिगरे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था शाखा कोवाड संचालकपदी निवड झाली आहे.
गणित विषयातील दबंग व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
याशिवाय विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन करणे, सामाजिक कार्यात हिरहीरीने भाग घेणे, चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगांव भागात गणित विषयाचे एक तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या शिक्षण व सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.