राजस्थान येथे 5 वि मध्ये शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला पाणी पिण्यावरू
एका शिक्षकाने जबर मारहाण केला होता . त्यामुळे त्या जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण देशभर त्या शिक्षकाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे .
काल रात्री आंबेडकर फांथर्स आणि दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद संघटनेच्या वतीने लहान शाळकरी विद्यार्थ्यांनवर होत असलेल्या अन्याय विरोधात तीव्र आक्रोश करत आंबेडकर उद्यान ते चन्नमा चौकापर्यंत कॅण्डल रॅली कडून चन्नमा चौकात श्रद्धांजली वाहिण्यात आली व त्या घटनेचा तीव्र निषेध करून त्या लहान मुलाला तो शिक्षक समजावून सांगितला असता तर चांगले झाले असते पण त्या शिक्षकाणे शिक्षकाच्या वृत्तीला काळिमा फासण्याचे काम केला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी आंबेडकर पँथर्सचे श्रीनिवास तळवार मानतेश तलवार, राजू तळवार ,राजेश कांबळे ,दुर्गांना कांबळे, दत्ता कांबळे ,कुमार देवरमणी, राजश्री कांबळे, अनिता कांबळे, रफिक मिरचीवाले सहित विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते