शेट्टी गल्ली येथील गटारीला भगदाड पडल्याने संभाव्य धोका ओळखून या ठिकाणी नवीन गटार चे काम करण्यात आले.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी येथील काम हाती घेण्यात आले मात्र येथील काम पूर्ण होऊन देखील रस्त्याच्या मध्ये टाकण्यात आलेले माती बाजूला करण्यात न आल्याने समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे शेट्टी गल्ली येथील रिक्षा चार चाकी वाहनांना चव्हाट गल्ली आणि आरटीओ मार्गे भडकल गल्ली खडक गल्ली दरबार गल्ली या ठिकाणी जावे लागत आहे.
येथील काम पूर्ण करून देखील संबंधित प्रशासनाने रस्त्यावर टाकण्यात आलेली माती दगड यासह अनेक वस्तू वेळीच बाजूला न केल्याने अनेक वाहनधारकांना वळसा घेऊन जावे लागत आहे
तसेच या ठिकाणी असणाऱ्या नागरिक तसेच विद्यार्थ्यांना देखील कामानिमित्त आणि महाविद्यालया जाण्याकरिता मुश्किल बनले आहे
काहीजण रस्त्याच्या पलीकडे आपली वाहने लावत असल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे येथील रस्त्यावरील खुदाई करून टाकण्यात आलेली माती दगड या अन्य साहित्य लवकरात लवकर बाजूला करावी अशी मागणी शेट्टी गल्ली येथील नागरिकांनी केली आहे.