मराठा बँकेने सामाजिक बांधिलकी जपत तळागाळात पोहोचली आहे त्यामुळे बेळगाव परिसरातील सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे.बँकेचे ग्राहक हेच खरे आधारस्तंभ आहेत त्यांना अधिकाधिक सोयी देण्याचा बँकेचा प्रयत्न स्तुत्य आहे.असे गौरव उदगार पुणे पीपल्स को ऑप रेटिव्ह बँकेचे चेअरमन वकील सुभाष मोहिते यांनी काढले.बेळगाव येथील मराठा को ऑप बँकेला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते.
प्रास्तविक करताना बँकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी सांगितले की जेष्ठ समाज धुरीणांच्या प्रेरणेतून मराठा बँकेची उभारणी झाली आहे समाज हित लक्षात घेऊन बँक वाटचाल करत आहे म्हणून बँक जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते वकील सुभाष मोहिते यांचा शाल देऊन सत्कार केला.
वकील सुभाष मोहिते बोलताना म्हणाले की सहकार हा विश्वासावर निगडित आहे सर्वसामन्यांना सहकारामुळेच मदत होत आहे.सहकारा मुळेच नाती जोडता येतात मात्र राज्य आणि केंद्र सरकारने सहकारा बाबत म्हणावी तेवढी भूमिका स्पष्ट केलेलीं नाही त्यामुळे या बदलत्या आणि नाजूक अवस्थेतून सहकार चालला आहे.यावेळी बँकेचे संचालक बी बी पाटील,एस एल होनगेकर,बी एस पाटील,शेखर हंडे,विनोद हंगिरकर,मोहन चौगुले,शिवाजी नाईक,रेणू किल्लेकर जनरल मॅनेजर संतोष धामणेकर आदी उपस्थित होते.उपाध्यक्ष निना काकतकर यांनी आभार मानले.