इतर जनावरांपेक्षा हत्ती बुद्धीने चालाख आणि हुशार असतात त्यामुळे आता बिबट्याला शोधण्याकरिता दोन हत्ती आणण्यात आले आहेत. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याकरिता अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.मात्र या उपायोजना अपयशी ठरत असल्याने आता कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सकरेबैलू येथील हत्ती कॅम्पेथून दोन हत्ती बिबटयाच्या शोधा साठी आले आहेत
या हत्तीवर बसून बंदुकी द्वारे गुंगीचे इंजेक्शन देणाऱ्या आणखीन दोन तज्ञ शार्प शूटर ला देखील बेळगाव मध्ये प्राचारण करण्यात आले आहे. त्यामुळे बिबट्या जेरबंद होईल असा विश्वास वनखात्याकडून व्यक्त केला जात आहे.
तसेच त्यांनी बिबट्याला पकडण्याकरिता जाळ्याची संख्या वाढविण्याच्या आदेश देखील दिला आहे. तसेच पिंजरे देखील ठेवण्यात आले आहेत. बिबट्याला पकडण्याकरिता 24 ट्रॅप कॅमेऱ्यांसह सात लोखंडी पिंजरे देखील ठेवण्यात आले असून बिबट्याचा मागोवा लागण्याकरिता मुधोळ हाऊंड प्रशिक्षित कुत्र्यांची मदत देखील घेण्यात येत आहे.
तसेच बिबट्या एवढ्या सगळ्या उपाययोजना करून देखील लवकर सापडेनासा झाला असल्याने आता या मोहिमेत हा दोन हत्तींची देखील भर करण्यात आली आहे.