अनेक वर्षांच्या प्रदीर्घ विलंबानंतर बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाने (बुडा) डीसी कार्यालय परिसरात काँक्रिटचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
या भागातील अनेक रस्ते दीर्घकाळापासून खराब झाले असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
जिल्हा न्यायालय भागात अनेक सरकारी कार्यालये आहेत .त्यामुळे याठिकाणी दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात .त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि रस्ते स्मार्ट करण्याकरिता हा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाने (BUDA) DC कार्यालय परिसरातील रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरण (CC Road) कामासाठी अंदाजे 97.83 लाख रुपये खर्चाची निविदा मागवली आहे. करार दिल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत (जुलै ते ऑक्टोबर पावसाळ्यासह) काम पूर्ण करण्याचे आहे.त्यामुळे येत्या दोन महिन्यातच हा रस्ता तयार होणार आहे