No menu items!
Monday, December 23, 2024

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

Must read

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य असे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले.
कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येतील नेहरू हायस्कूलमध्ये हे आरोग्य शिबिर संपन्न झाले २० हून अधिक हॉस्पिटलने सहभाग नोंदवला होता.
सिपीआर हॉस्पीटल,डायमंड हॉस्पीटल,लाईफ लाईन हॉस्पीटल तज्ञ, स्वस्तीक हॉस्पीटल, ममता हॉस्पीटल,एशियन हॉस्पीटल,श्रृतिका लॅब व डायग्नॉस्टिक सेंटर,मसाई हॉस्पीटल,नंदादीप नेत्रालय,जया युरालॉजी हॉस्पीटल, मुक्तांगण हॉस्पीटल, मोडक हॉस्पीटल,स्टार हॉस्पीटल, सनराईस हॉस्पीटल,अंतरंग हॉस्पीटल तज्ञ डॉ. गौसिया क्लिनिक,
कोल्हापूर जिल्हा रुग्णालय व हिंद लॅब अशा अनेक नामवंत हॉस्पिटल मधील तज्ञ डॉ. व त्यांचे सहकारी यांनी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारपर्यंत विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी केली. यामधे मेंदू रोग, मणक्याचे आजार, डोळे तपासणी, हृदयरोग,लहान मुलांसाठी वीविध बाल रोग तज्ञ डॉ तपासणी करत होते, स्रीरोग साठी विशेष करून महिलांसाठी विविध आजारांवर तपासणी करत होते,कान नाक घसा,रक्तविकार – थैलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, अॅनिमिया,लुकेमिया ,किडणी व मुतखडा,गॅस्ट्रॉलॉजी,हार्ट- कार्डिया, अशा विविध प्रकारच्या अनेक आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. जवळपास २६० पेक्षा अधिक लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.
नामवंत हॉस्पिटल ने विशेष करून वेळ काढून शिबिरात सहभागी झाल्या बद्दल त्यांना युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व समवेदना मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी बोलतान युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी सर्व हॉस्पिटल आणि डॉक्टर्स यांना ग्रामीण भागातआणि दुर्गम भागात ही अशी शिबीर आयोजित करावीत असे आवाहन केले आणि भविष्यात तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नेहमी तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही देखील दिली. समवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी सर्व हॉस्पिटल आणि त्यांचे तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.आणि पुढे असेच कार्य करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, समवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर, शिवसेना उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर, जकि मुल्ला, रतन हुलस्वार, अजय शिंगे, शामली वायदंडे,जावेद देवडी, दत्तात्रय कोंडेकर, कौतुक नागवेकर,प्रकाश कांबळे, संदीप पावर, प्रकाश देवणे, श्रद्धा जोगळेकर, कु. स्नेहा शिंगे तसेच युवा पत्रकार संघ आणि समवेदना फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सभासद, विविध हॉस्पिटलचे डॉक्टर्स कर्मचारी आणि शिबिरासाठी आलेले नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!