चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे स्नेहसंमेलन नुकतेच सुभाषनगर नागरिक संघटना सभागृहात पार पडले. कार्यक्रमाला बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी आप्पासाहेब गुरव होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत सदस्य, धारातीर्थी पडलेले जवान, कोरोना काळात दगावलेले नागरिक या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सतीश बेळगुंदी यांनी स्वागतगीत गायिले. रमेश रायजादे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा मजुकर व प्रदीप परब यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मिलिंद हलगेकर यांनी आरोग्याशी संबंधित सूचना केल्याव आपत्कालीन परिस्थितीत पेशंटला द्यायचे प्रथम सहाय (फर्सट एड) विषय प्रात्यक्षिका सह माहिती दिली .
तसेच ज्या सदस्यांनी वयाची ७५ वर्ष पुर्ण केले आहेत, त्यांचा पण सत्कार करण्यात आला. यावेळी वॉकर्स ग्रूपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.