पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यास गेले असता एका वॉटरमनला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना माचीगड ग्रामपंचायत मध्ये घडली आहे.
रामचंद्र शिंदे वय 42 असे मृत्यू झालेल्या वॉटरमनचे नाव आहे. रामचंद्र हे काल सकाळी पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंप सुरू करत असताना विद्युत प्रवाहमुळे विजेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले.
यावेळी ही माहिती समजताच येथील नागरिकांनी त्यांना खानापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार करण्याआधीच त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.