कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न प्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली.त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्री सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात वकील राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव न्यायालयात उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांशी दूरध्वनीवर बातचीत केली.महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयात मांडा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी वकिलांना केली.