भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू वाहक आयएनएस विक्रांत प्राप्त होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे कोचीन शिपयार्ड येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय नौदलाला नवीन ध्वज समर्पित केले आहे. त्यामुळे भारतीय नौदलाला आज नवीन ध्वज मिळाले आहे .
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले .यावेळी त्यांनी नौदलाचा हा नवा ध्वज शिवरायांना समर्पित केल्याचा देखील सांगितले .या नवीन नौदल चिन्हाने वसाहतीकाळातील गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतिकात्मकते पासून मुक्तता मिळाली आहे.
यावेळी सदर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला .यावेळी त्यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचा अनावरण करताना असे म्हटले की भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटिश राज हटवला आहे याचं कारण म्हणजे या आधीच भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉस च चिन्ह होतं ते हटवून आत्ता झेंड्यावर नांगर असणार भारतीय नौदलाचे चिन्ह आहे त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरूण हे ब्रीद लिहिलेला आहे याचा अर्थ जलदेवता वरून आम्हाला आशीर्वाद देऊ असा आहे असे सांगितले.



