सुरुते येथे सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
शिनोळी ( रवी पाटील )
चंदगड येथील श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पंतसंस्थेची सन् 2021-22 ची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर सुतार होते .
7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यावर्षी सुरुते येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यी नींच्या स्वागत गीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले होते . सर्व संचालक मंडळाचे स्वागत करण्यात आले. पतसंस्थेचे व्हा. चेअरमन प्रा.व्ही .के . गावडे यांनी प्रास्ताविक केले . अहवाल वाचन मानद सचिव एस. बी .भोसले केले . यावेळी अल्पावधितच संस्थेला 21 लाख रुपयाचा नफा झाला असून 9 कोटी ताळेबंद व 10.5 कर्जाचा व्याजदर आणि सभासदांना 13 टक्के लाभांश याप्रमाणे सभासदांच्या दहावी , बारावी व स्कॉलरशिप यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले .
मार्च -2022 च्या 10 वी परिक्षेत विशेष प्राविण्यामध्ये श्रेया अशितोष धायगुडे 97% , तेजस तानाजी बेरडे 96.60 % संस्कार सुधाकर माने 96.40 % अस्मिता मारुती माडखोलकर 96 % वैष्णवी गुलाबराव पाटील 95.60 % आणि बारावी विशेष प्राविण्य मिळवले विद्यार्थी भूमिका केदारी निकम 88.33 % अर्थव संभाजी सावंत 87.17 % समर्थ शशिकांत खोराटे 82.50 % सायली जानबा पाटील 71 % साक्षी संजय नंद्याळकर 65.50 % अदित्य अनिल बिर्जे 86.50 % श्लेषा आप्पासाहेब कमलाकर 85.50 % तसेच नवोदय व स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झालेले हर्षदा विजय कोले , कृष्णाई संदिप पवार , रुद्र गुलाबराव पाटील , मधुरा तानाजी बोकडे , श्रीधर सुधाकर माने , आदित्य राजन बोकडे व जान्हवी विश्वास पाटील या गुणी विद्यार्थ्यांना संचालकांच्या हस्ते रोख रक्कम ,शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले .
संस्थेचे सभासद विशेष पुरस्काराने सन्मानित असलेले शिनोळी हायस्कूलचे ,रवींद्र पाटील सर , न्यू इंग्लिश स्कूल चे बसवंत चिगरे ,सुंडी हायस्कूलचे मनोहर भुजबळ सर यांना शाल, श्रीफळ , स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरुते या शाळेला कोल्हापूर जिल्हास्तरिय ‘स्वच्छ सुंदर शाळेचा ‘ बहुमान पटकावला याबद्दल मुख्याध्यापक मधुकर सुतार व शिक्षक वर्गासमवेत पतसंस्थेच्यावतीने शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त सभासद
सातवणेकर , सुरेश गोपाळ तुर्केवाडकर ,पी. बी.चौगुले , पी.एफ.कांबळे व पी. एन.कालकुंदरीकर या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम सुरुते व शिनोळी शिक्षक वर्गाने घेतला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टी.टी. बेरडे यांनी केले तर संचालक टी.एस .चांदेकर यानी आभार मानले.