मराठा मंडळ शिवराज हायस्कूल राकसकोप येथील चित्र कला विषयाचे शिक्षक श्री जी. बी. लोहार यांना शिक्षक दिनाच्यानिमीत्त साई भवन खासबाग येथे सार्वजनीक साक्षरता विभाग, क्षेत्र शिक्षणाधिकरी कार्यालय, बेळगाव ग्रामीण यांच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श चित्रकला शिक्षक मान्यवराच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्रं देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणवेळी बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, तालुका गट शिक्षणाधिकारी. श्री. आर. पी. जूट णावर याच्यासह अन्य आधिकारी, शिक्षक सघाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. जी. बी. लोहार सर हे एक शिस्तप्रिय शिक्षक व प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. त्यांना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू हलगेकर यांचे सतत मार्गदर्शन लाभत आहे .
त्यांनी शिक्षकी सेवा कार्य करतांना अनेक तालुका, जिल्हा पातळीवर व समाज्यमध्ये आपल्या चित्रकलेचे कार्य प्रामाणीकपणे केले,यामुळे त्यांना हा तालुकास्तरीय पुरस्कार मिळलेला आहे. या पुरस्कारांमुळे त्याचें मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु हलगेकर सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक वृद. विद्यार्थी, इतर सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.