महिला विद्यालय हायस्कूलच्या सहशिक्षिका श्रीमती अस्मिता अतुल देशपांडे यांना रोटरी-ई बेळगाव यांच्या तर्फे शिक्षक दिनानिमित्त नेशनल बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीमती अस्मिता देशपांडे या महिला विद्यालय हायस्कूलमध्ये 2001 पासून गेली 21 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांचे शिक्षण – एम्. ए. बी. एड्. झाले असून महाविद्यालयीन शिक्षण – एस्. एन्. डी.टी. महाविद्यालय कर्वे रोड, पुणे येथे झाले आहे. त्यांना कविता व कथा लेखनाची आवड आहे. विविध दिवाळी अंकात त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
इयत्ता पहिली ते चौथी, तसेच पाचवी ते सातवीच्या शिक्षकांना मराठी व्याकरण व ग्रंथालय नियोजन विषयाचे मार्गदर्शन व संपन्मूल व्यक्ती म्हणून कार्य केले आहे. वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले असून, अनेक पारितोषिक मिळविली आहेत.
देशभक्तीपरगीताचे लेखन स्वतः करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आंतरशालेय स्पर्धेत दोन वेळा पारितोषिक पटकावले. शिक्षण खात्यातर्फे शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका गुरुचेतना कन्नडचे मराठीत भाषांतर केले आहे. कमिटीत मुख्य म्हणून कार्य केले आहे. दैनिक तरुण भारतमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंत व्हा ‘लेखनमालेत मराठी भाषा विषयाचे मार्गदर्शन लेखन केले आहे.
लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती केली. 2008 ते 2016 सरकारच्यावतीने आयोजित शैक्षणिक समुदाय दत्त कार्यक्रमात नोडल अधिकारी म्हणून कार्य केले आहे. रोटरीच्या या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे जिल्हाप्रमुख श्री व्यंकटेश देशपांडे व रोटरीचे माजी गव्हर्नर गौरीश धोंड, श्री हणमगौड, डॉक्टर पाटील उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुका बेळगाव ग्रामीण, बेळगाव शहर मिळून अकरा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.