नागरिकांच्या प्रामाणिकपणामुळे महसूल विभागाचे मनोज कुमार बसेनाप्पा यांची हरवलेली बॅग मिळाली आहे.
येथील हिंडलगा जेल येथे महसूल डिपार्टमेंटचे मनोज कुमार बसवेनप्पा यांची बॅग हरवली होती. त्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड लायसन्स पैसे देखील होते.तसेच ही त्यांची बॅग या ठिकाणी त्यांना न कळत पडली होती.
यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील धाकलू बेळगुळकर संजय जगताप बाळकृष्ण काकतकर यांनी ही बॅग पाहताच येथील डॉक्युमेंट्स च्या आधारे मनोज कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची भेट देऊ केली.
महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि कामासाठी लागणारी कागदपत्रे यात असल्याने नागरिकांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी माणुसकी अजूनही जिवंत आहे हे हिंडलगा येथील गावकऱ्यांनी आपल्या प्रामाणिक ते मधून दाखवून दिले आहे