महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची कोणतीही चिन्हे फेब्रुवारीत नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे.
बेळगावच्या या महत्वाच्या पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून उपमहापौर हा मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे, तर महानगरपालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून या पदासाठी भाजप उमेदवाराला मोठा फायदा होणार आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुका दोन वर्षांनी झाल्या असून आता महापौरांची निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असून, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच महापौर निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव असल्याने ही जागा यावेळी पंचमसाली समाजाच्या महिलेला देण्यात यावी, अशी मागणी पंचमसाली गुरुपीठाच्या जगद्गुरू जय मृत्युंजय महास्वामी यांनी बेळगावात केली हे विशेष.
यापूर्वी महापौरांची निवडणूक आली तेव्हा कन्नड मराठी नावाची लढत झाली होती, मात्र जातीनिहाय प्रस्ताव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.