No menu items!
Tuesday, December 3, 2024

ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढा

Must read

बेळगाव

सरकारी कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. फक्त नागरिकच नाहीतर अधिकारी आणि कर्मचारी देखील या समस्येला वैतागले आहेत. विविध कामांसाठी सरकारी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना तेथील गैरव्यवस्था आणि असुविधेचा नेहमी फटका बसत आहे. संबंधित कार्यालयातील व कर्मचाऱ्यांकडून होणारी चालढकल आणि अन्य कारणांमुळे अनेक लोकांना बऱ्याच कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत त्यात सर्व्हर डाऊन ची समस्या वारंवार डोके वर काढत असल्याने नागरिकांच्या समस्येत भर पडत आहे.बऱ्याच कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या असल्याने कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. नागरिकांसाठी भू दाखला ,नोंदणी, तहसील कार्यालय ,अन्न व नागरी पुरवठा ,बेळगाव वन ,पोस्ट आदी महत्त्वाची कार्यालये आहेत .या सर्व ठिकाणी सर्व्हर डाऊन ची समस्या असल्याने कामानिमित्त येणारे नागरिक वैतागले आहेत. सध्या सरकारी सर्व कर्मचारी ऑनलाइन पद्धतीचा वापर करत आहेत मात्र याही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने कामे ठप्प होत आहेत .त्यामुळे संपूर्ण यंत्रणा पूर्ववत होईपर्यंत अधिकारी-कर्मचारी वर्गासह नागरिकांना देखील प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढावी आणि वेळेवर कामे पूर्ण करून देण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!