No menu items!
Tuesday, January 13, 2026

सदाशिवनगर रुद्र भूमीमध्ये (स्मशानभूमी मध्ये) गॅस ऑपरेटेड बर्नर वर अंत्यसंस्काराची व्यवस्था होणार

Must read

जीवनात मृत्यू हा सर्वात शेवटचा क्षण असतो त्यानंतर मृतदेहाला सविस्तरपणे व सर्व संस्काराने त्याची विल्हेवाट व्हावी हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असते. कर्नाटकात व भारतात बऱ्याच ठिकाणी गॅस ऑपरेटेड बर्नर वर अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्था व्हावी अशी माहिती मिळताच त्वरित महानगरपालिकेचे कमिशनर व इतर अधिकारी यांच्याशी चर्चा करून ही सिस्टम सदाशिवनगर स्मशानभूमीत का करू नये? कारण आता ज्या पारंपारिक पद्धती आहेत म्हणजे लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार करणे आणि त्याचा खर्च जवळ जवळ 3 ते 4 हजार रुपये येतो व तो मृतदेह संपुर्णपणे दहन होण्यास 4 ते 5 तास लागतात तसेच डिझेल ऑपरेटेड बर्नर वर 5 हजार येत होता आणि त्याला सुद्धा चार तास लागायचे तसेच इलेक्ट्रिक बर्नर खूप खर्चिक होतात या सर्व गोष्टींचा विचार विनिमय करून फक्त 1000 रुपये खर्चातून व कमी वेळेत म्हणजे एक तासात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी गॅस ऑपरेटेड बर्नरची व्यवस्था सी एस आर फंडातून मेघा गॅस कंपनीकडून करून घेतली आहे व त्याचे एक प्रात्यक्षिक म्हणजे एक मृतदेह त्या बर्नर मध्ये ठेवून त्याची सहनिशा करून हे व्यवस्थित आहे याची खबरदारी घेतली आहे यामुळे प्रदूषण सुद्धा होणार नाही व खर्च कमी होईल याची काळजी घेतली आहे. या प्रक्रियेला लवकरात लवकर चालना देण्यात येईल.

या प्रात्यक्षिका वेळी आमदारांसमवेत महानगरपालिकेचे अधिकारी, मेघा गॅस एजन्सी चे अधिकारी व बॉम्बे गॅस एजन्सी टेक्निकल्टी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!