कार्तिक एकादशीनिमित्त महिला विद्यालय प्राथमिक शाळेतील बालवाडी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.
यावेळी विद्यार्थिनींना वारकरी संप्रदायाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी जवळपास 132 विद्यार्थ्यांनी शाळेपासून हॉटेल सन्मान कंग्राळ गल्ली गोंधळी गल्ली समादेवी गल्ली खडे बाजार या मार्गे विठ्ठल मंदिराला भेट दिली आणि या ठिकाणी विठुनामाचा गजर करत फुगड्या घातल्या.
त्यानंतर परत माघारी खडे बाजार नार्वेकर गल्ली गवळी गल्ली कंग्राळ गल्ली मार्गे दिंडी शाळेत आली.दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही शाळेमध्ये दिंडी काढल्यामुळे रोजच्या दिनचर्येतून विद्यार्थिनींना
एक वेगळा विरंगुळा मिळाला. यावेळी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी सह शिक्षक देखील या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.



