3 आणि 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी दिली
.आज शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी ते म्हणाले की इंडस्ट्रीज 4.0 या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जात आहे. खासदार मंगला अंगडी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.विद्याशंकर ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच यावेळी इंडस्ट्रीज 4.0 वर KLE चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे व्याख्यान होणार आहे. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आले .
इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगच्या वतीने दरवर्षी सेमिनारचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावेळीही बेळगावात आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राम भंडारी म्हणाले की, बेळगावातील औद्योगिक कंपन्या विकसित करण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू आहे. येत्या अधिवेशनात याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.व् याप्रसंगी रमेश जंगल ,राम भंडारी ,सी बी हिरेमठ व्ही .बी.जावुर,पी जि धरणी आय ई ए चे कार्यकारी समिती सदस्य आणि कार्यक्रमाचे संयोजक विलास बदामी उपस्थित होते.