1 डिसेंबर हा जागतिक AIDS डे एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.हा दिवस FC 1988 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिक एड्स दिन हा जागतिक आरोग्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस होता. दरवर्षी, युनायटेड नेशन्स एजन्सी, सरकार आणि व्यक्ती एचआयव्हीशी (HIV) संबंधित खास थीमवर मोहीम राबवण्यासाठी एकत्र येतात. या दिवशी लोकांनामध्ये जनजागरूक करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. बरेच लोक या आजाराने ग्रस्त लोकांसाठी जागरूकता आणि समर्थनाचे प्रतीक म्हणून लाल रिबीन घालतात. या दिवसाचे महत्त्व जाणून प्राईड सहेलीने आश्रय फाउंडेशन ला भेट दिली आणि उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना फळे वाटप केली.
या उपक्रमाला सचिव जिग्ना शहा रूपा मंगावती व पवन राजपुरोहित उपस्थित होत्या