महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येणार असल्याने याचा निषेध करण्यासाठी करिता आज कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगावला दाखल होणार होते. मात्र त्यांना पोलिसांनी हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ अडविले.
यावेळी करवे च्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले तसेच महाराष्ट्राच्या खाजगी वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. त्यासोबतच महाराष्ट्राची नंबर प्लेट असलेल्या गाडीच्या पाट्या देखील त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला..
यावेळी त्यांनी तोडफोड करत असल्याचे निदर्शनास येताच कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक केली.यावेळी करवेचे काही कार्यकर्ते महामार्गावर ठाण मांडून बसले आणि आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहने अडकून पडली होती.