नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन दिल्लीत आज तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत दाखल झालेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील दिल्लीला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमावादावर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी ही बैठक बोलावल्याची चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत अशी सविस्तर कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या बैठकीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत