सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा बि के कंग्राळी ही शाळा 110 वर्षा पूर्वी पासून उभी आहे मात्र शाळेचा विकास करायचा असेल तर ही जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची गरज आहे त्यामुळे इमारत पाडण्याकरिता बी के कंग्राळी येथील माजी विद्यार्थी संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले . यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी या निवेदनाचा स्वीकार केला.
मी शाळेचा शाळा माझी या संकल्पनेतून माझी विद्यार्थी संघटनेने येथील शाळेचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे त्यानुसार ही शाळा सहा मजली असून या शाळेचे बांधकाम सुरू झाले आहे.
तसेच शाळेच्या शेजारी असलेली शाळेची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी विकास करण्याकरिता ही जुनी इमारत वाढवण्याची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.