No menu items!
Saturday, August 30, 2025

सर्वात मोठी बातमी! सीमावादावर तात्पुरता तोडगा निघाला, अमित शाह यांनी नेमकं काय सांगितलं?वाचा फक्त बेळगाव केसरी

Must read

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठी घडामोड घडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. संसदेत अमित शाह यांच्या कार्यालयात दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकिती काय निर्णय घेतले गेले याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तात्पुरता तोडगा निघाला असल्याचं स्पष्ट केलं. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

यावेळी ते म्हणाले की “सीमेवरुन जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली. चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले आहेत”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

त्यानंतर ते म्हणाले की “सीमा प्रश्नावर भांडण करुन नाही, रस्त्यावर उतरुन नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असं बैठकीत निश्चित झालंय”, असंदेखील शाह यांनी सांगितलं.

तसेच “काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यत कोणतंही राज्य या विषयावर कोणताही दावा करणार नाही”, आणखी काही मुद्देही दोन राज्यांमध्ये आहेत. अशा मुद्द्यांचं निवारणही हे सहा मंत्री करतील, असंही त्यांनी सांगितलं.

त्यानंतर ते म्हणाले की “दोन्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठिक राहावी. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनवण्यासाठी सहमत झाली आहे. ही कमिटी कायदा-व्यवस्थेवर ताबा ठेवण्याचं काम करेल”, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!