दिनांक 19 डिसेंबर 2022रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस अधिकारी
आणि म.ए.समितीचे पदाधिकारी यांची बैठक आज सकाळी ठीक 10-30 वाजता असि कमिशनर चंद्रप्पा यांच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. पोलीस
उपायुक्त गडादी यांनी समिती पदाधिकारी व समितीच्या पदाधिकारी यांच्याकडून मेळाव्याबाबत माहिती घेतली.
मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या अध्यक्षांना पत्रे लिहिली असून जे नेते येतील त्यांच्याबद्दल आम्ही कळवू शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र -कर्नाटकातून
नेत्यांना अटकाव करू नये असे म्हटल्याचे सांगितले. यावर महाराष्ट्रातील नेत्यांना येऊ नका असे आवाहन करा अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली .यावर आम्ही आमचा मेळावा शांततेत पार पाडतो आपण सर्व सहकार्य करावे अशी विनंती समितीच्या
पदाधिकारयांनी केली.
बैठकीस कार्याध्यक्ष मनोहर किणेकर सरचिटणीस मालोजी अष्टेकर खजिनदार श
प्रकाश मरगाळे चिटणीस रणजित चव्हाणपाटील तालुका सरचिटणीस एम.जी.-
पाटील, विकास कलघटगी असि
कमिशनर नारायण बरमणी श्री चंद्रप्पा खडेबाजार सी.पी.-आय श्री निंबाळकर टिळकवाडीसी.पी.आय हे उपस्थित होते.