येत्या १९ डिसेंबर पासून बेळगावमध्ये सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मसुदा मंजूर करण्यात यावा यासाठी आज , बेळगाव बार असोसिएशनतर्फे आंदोलन छेडण्यात आले .
यावेळी बेळगाव बार असोसिशनच्या वतीने , तीव्र आंदोलन छेडून , रास्ता रोको करण्यात आला . त्याचप्रमाणे , मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .यावेळी
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . प्रभू यतनट्टी , उपाध्यक्ष ऍड . सुधीर चव्हाण , ऍड . सचिन शिवण्णावर तसेच जेष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले .