No menu items!
Monday, September 1, 2025

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे आश्वासन

Must read

कुठल्याही परिस्थितीत विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच ! – सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार

 गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण आम्ही हटवणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाची बाजी लावून गडकिल्ले जिंकले आहेत. आपण कायद्याची बाजू लावून धरणार आणि गडांवरील अतिक्रमणे हटवणारच. एकशेएक टक्के आम्ही गडावरील अतिक्रमणे हटवू. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून विरोध होत असला, तरी सरकार अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, याविषयी आमचा निर्धार पक्का आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले. राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’चे राज्य संघटक आणि ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांनी मा. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.

अतिक्रमणे हटवणार्‍या वनविभागाच्या अधिकार्‍यांना काही धर्मांधांकडून, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून धमक्या येत आहेत, याविषयी समितीचे श्री. घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना सांगितले. याविषयी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही अतिक्रमणे हटवणार आहोत. धमक्या देणार्‍यांवरही आम्ही कारवाई करू. समितीने दिलेल्या निवेदनांच्या संदर्भात बोलतांना मा. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, तुम्ही दिलेली गडकिल्ल्यांच्या संदर्भातील निवेदने वेगवेगळ्या खात्यांशी संबधित आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती मागवून घेण्याचे आदेश दिले. विशाळगडावर शासकीय योजना राबवून अतिक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे. कुठल्याही परिस्थितीत ती सुद्धा अतिक्रमणे काढली जाणारच आहेत.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे वर्षानुवर्षे ‘संरक्षित’ केलेले अतिक्रमण हटवले, यासंदर्भात मा. श्री. मुनगंटीवार साहेब यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले.

आपला नम्र,

श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड.
प्रवक्ता, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, महाराष्ट्र.
संपर्क क्र. : 70203 83264

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!