महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवादाबाबत महाराष्ट्राने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.दिल्लीमध्ये झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता .
त्यामुळे महाराष्ट्राच्या समितीत कायदा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक,कोल्हापूर आय जी,कोल्हापूर एस पी,सांगली एस पी यांचा समावेश असणार आहे .सीमावर्ती भागातील म्हणजे बेळगाव कारवार बिदर भालकी यासह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना, प्रवासी,व्यापारी,यांना त्रास होणार नाही याची काळजी सदर समिती घेणार आहे .