विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) तर्फे रौप्य महोत्सवानिमित्त ४ व ५ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्हीटीयूच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे
बुधवार दि. ४ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत योगेश छाब्रिया, दुपारी ३ ते ४.३० या वेळेत मुरलीधर, गुरुवार दि. ५ रोजी सकाळी १० ते १२.१५ या वेळेत अमोघ लिलाप्रभू, दुपारी १२.३० ते २ या वेळेत विवेक सावंत व दुपारी ३.१५ ते ४.३० या वेळेत डॉ. योगेश पै मार्गदर्शन करणार आहेत.तांत्रिक क्षेत्रातील मान्यवर या दोन दिवसांमध्ये आपली उपस्थिती दर्शवून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत