No menu items!
Wednesday, August 27, 2025

दादर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

Must read

सोनी टीव्ही’ने मागितलेली माफी हिंदूंच्या तोंडाला पाने पुसणारी; मागे घेतलेल्या भागात सत्य घटना मांडून तो भाग पुनर्प्रसारित करा !

*मुंबई* - ‘सोनी टीव्ही’ वरील ‘क्राईम पट्रोल 2.0’च्या 212 क्रमांकाच्या भागामध्ये धर्मांध आफताबची व्यक्तिरेखा ‘मिहिर’ या हिंदू नावाने आणि श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची व्यक्तिरेखा ‘अ‍ॅना फर्नांडिस’ या ख्रिस्ती नावाने दाखवली. हे अत्यंत संतापजनक आहे. ‘सोनी टीव्ही’च्या निर्मात्यांनी 35 तुकडे करणार्‍या आफताबला पाठिशी घालत हिंदु युवकाने ही निघृण हत्या केल्याचे दाखवले. या गुन्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला. याचा हिंदु समाजाने जोरदार विरोध केला. त्यानंतर ‘सोनी टीव्ही’ने ‘ही घटना आफताब-श्रद्धा वालकर यांच्या संदर्भातील नसून वर्ष 2011 ची आहे. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर खेद आहे’ अशा आशयाची दिशाभूल करणारी माफी मागितली आहे. हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. जर हा भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर सोनी टीव्हीने त्यांच्या अँपवरील 212 क्रमांकाचा एपिसोड डिलीट का केला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. जोवर हा एपिसोड एडिट करून सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवू, अशी चेतावनी *हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर* यांनी या वेळी दिली. *‘सोनी टीव्ही’ च्या विरोधात मुंबईत दादर (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर करण्यात आलेल्या ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त* ते बोलत होते.

सोनी टीव्हीने माफी मागतांना दिलेल्या स्पष्टीकरणात ‘यह एपिसोड काल्पनिक है, जो साल 2011 हुई कुछ घटनाआेंपर आधारित है ।’ असे म्हटले आहे. एकीकडे या कार्यक्रमापूर्वी सूचना सांगितली जाते, ‘हा एपिसोड सत्य घटनेवर आधारित आहे’ तर माफी मागतांना तो काल्पनिक कसा होतो ? तसेच जर काल्पनिक आहे, तर वर्ष 2011 च्या घटनेवर आधारित आहे, असे कसे असू शकेल ? यातून सोनी टीव्ही खोटारडेपणा करत आहे. त्यांनी वर्ष 2011 चे कोणते प्रकरण आहे, ज्यावर हा एपिसोड आधारित होता, त्याचा तपशील 2 दिवसांत जाहीर करावा; अन्यथा सोनी टीव्हीने पुन्हा हिंदु समाजाची पुन्हा दिशाभूल केली, असे समजून या आंदोलन आणखी तीव्र करू, असा निर्धार या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी केला.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ गुरुग्राम, हरियाणा येथे सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता, कंपनीने हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. अशी जनभावनांचा आदर न करणार्‍या सोनी टीव्हीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. खरेतर श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वस्तुस्थिती मांडून हिंदु युवतींना खर्‍या अर्थाने सतर्क करण्याची संधी या कार्यक्रमातून साधता आली असती; मात्र गुन्हेगारांचे धर्म पालटून हिंदूंना गुन्हेगार दाखवण्याचा हेतूतः प्रयत्न केला गेला. याचा तीव्र निषेध या वेळी करण्यात आला. या एपिसोडमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना निर्माण झाल्यानेच ट्वीटरवर #BoycottSonyTV हा हॅशटॅग दोन दिवस ट्रेंडींगमध्ये होता. या वेळी धर्मप्रेमी हिंदूंनी हातात फलक धरत, घोषणा देत सोनी टीव्हीचा निषेध करण्यात आला.

आपला नम्र,
डॉ. उदय धुरी,
‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’करिता,
(संपर्क क्र. 9967671027)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!