No menu items!
Wednesday, August 27, 2025

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने बेंगळुरू येथे राष्ट्रीय परिषदेत 100 वा शोधनिबंध सादर

Must read

सत्त्वप्रधान कृती आणि विचार सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात ! – संशोधनाचा निष्कर्ष

कला, संगीत, अन्न, पेय, धार्मिक चिन्हे आणि स्मारके आदींतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदनांचा परिणाम प्रत्येकावर होत असतो. यानुसार आपली कृती आणि विचार सत्त्वप्रधान असतील, तेव्हाच त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, *असा निष्कर्ष ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंध सादर करतांना मांडला.* ते बेंगळुरू येथील ‘नाद वेद अध्यात्म केंद्र (एनव्हीएके) अँड व्हेव्ह्स’ यांनी आयोजित ‘कम्पिटिंग प्रॅक्टीसेस ऑफ धर्म ॲण्ड अधर्म : सक्सेस ॲण्ड कॉन्सिक्वन्सेस ऑफ देअर वोटरीस इन वेदा अँड लेटर’ या परिषदेत बोलत होते. श्री. शॉन क्लार्क यांनी ‘दैनंदिन जीवनात धर्म किंवा अधर्म यांची निवड कशी करावी’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क यांनी यावेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस.) आणि ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफिअरन्स फोटोग्राफी’ (पिप) या उपकरणांचा वापर आणि आध्यात्मिक स्तरावर केलेले सूक्ष्म-परिक्षण यांद्वारे केलेल्या अभ्यासाच्या आधारावर  संशोधन सादर केले.

या वेळी संशोधनासाठी श्रीलक्ष्मीदेवीचे एका प्रसिद्ध चित्रकाराने काढलेले देवीचे विडंबनात्मक चित्र, एक बाजारात उपलब्ध चित्र आणि एक संतांच्या मार्गदर्शनानुसार काढलेले चित्र अशी तीन चित्रे निवडण्यात आली. वरील उपकरणांद्वारे संशोधन केल्यावर प्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्या देवीच्या विडंबनात्मक चित्रातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाल्याचे आढळले, तर बाजारात उपलब्ध असलेल्या चित्रात सकारात्मक अथवा नकारात्मक यांपैकी कोणतीच स्पंदने आढळली नाहीत. याउलट श्रीलक्ष्मीतत्त्व सर्वाधिक प्रमाणात आकर्षित करण्याची क्षमता असलेले संताच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेल्या चित्रातून अधिकाधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती, असे दिसून आले.

याच प्रकारे कपड्यांच्या रंगांविषयीही संशोधन करण्यात आले. यामध्ये काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या कापडांची वरील उपकरणांच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. यामध्ये पांढर्‍या रंगाच्या कापडाची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 18.75 मीटर आढळली आणि काळ्या रंगाच्या कापडामध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली नाही, असे दिसून आले. यांसह श्री. क्लार्क यांनी अन्न, पेय आणि मनोरंजन या संदर्भात केलेल्या प्रयोगांचेही निष्कर्ष मांडले. या सर्व घटकांचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारा परिणाम आणि मिळणारी सकारात्मक ऊर्जा यांविषयीही विस्ताराने माहिती दिली.

आपला नम्र,
श्री. आशिष सावंत,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,
(संपर्क : 9561574972)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!