रामदुर्ग तालुक्यातील चिंचनुर गावात विठ्ठल देवस्थानच्या जवळ एक अपघात घडला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात बुधवारी रात्री घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रामदुर्ग तालुक्यातील हुळकुंद गावचे रहिवासी महिंद्रा गुड्स वाहनातून यल्लमा देवीच्या दर्शनाकरिता निघाले होते. यावेळी त्यांचे वाहन एका झाडाला आढळले आणि हा अपघात झाला.
देवीच्या दर्शनाला जात असताना काळाने घाला घाली असल्याने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.