बेळगाव येथील रामदुर्ग तालुक्याच्या कटकोळ पोलीस ठाण्यांतर्गत चिंचनूरजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याचे मान्य केले आहे. अपघातात जखमी झालेल्याना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे.
प्रभारी मंत्र्यांचा शोक : अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला ईश्वर चिरशांती देवो, अशी प्रार्थना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. तसेच त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत .
काळाने घातला घाला – देवीचे दर्शनाला जात असताना सहा जणांचा अपघातात मृत्यू