हत्तरगी टोलनाक्या राष्ट्रीय महामार्ग चारवर परिवहन बसला शॉर्टसर्किटने आग लागली आहे. यावेळी प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवासी बस मधून बाहेर पडल्याने ते बचावले आहेत.
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसला शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याने यावेळी बस मध्ये बसलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली.
यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली.