बेळगावच्या युवा मोर्चाचे सचिव सौरभ सावंत यांनी बेळगावात ‘पिंक बस’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.तसेच त्यांनी याबाबतचे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिले होते .त्यानुसार 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी बेळगावात महिलांकरिता “पिंक बस” सेवा सुरू झाली आहे.याप्रसंगी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी हिरवा झेंडा दाखवून या पिंक बस सेवेचा शुभारंभ केला .
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, परिवहन विभाग आणि आदिवासी कल्याण मंत्री श्री श्रीरामुलू जी, बेळगाव मतदारसंघाच्या खासदार मंगल अंगडी ,बेळगाव उत्तरचे आमदार श्री अनिल बेनके जी, बेळगावचे जिल्हा नियंत्रक श्री पी व्ही नाईक जी, भाजप पदाधिकारी अॅड. धन्यकुमार पाटील जी, विवेक महंतशेट्टी उपस्थित होते.