रोटरी ई क्लब, डिस्ट्रिक्ट 3170 तर्फे 28 जानेवारी 2023 रोजी GSS कॉलेज, बेळगाव येथे व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक सेवा पुरस्कार (Vocational Award) बेळगाव येथील दोन विशेष दिव्यांग व्यक्तींना प्रदान करण्यात आला, ज्यांनी त्यांची उद्यमशीलता सिद्ध केली आणि समाजाला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायातून मदत केली.
काही रोटेरियन्स, अॅन्स ‘अॅनेट्स’ आणि रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षा जेनिफर जोन्स यांचे वाढदिवस केक कापून साजरे केले.
असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडिकॅप्डचे गिरीश सव्वाशेरी आणि खानापूर येथील लघुउद्योजक पुंडलिक कुंभार, यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आशुतोष डेव्हिड यांनी व्यावसायिक सेवा पुरस्काराची माहिती दिली. अनंत नाडागौडा यांनी पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून दिला. रोट्रॅक्ट युजेनिया रॉड्रिग्स यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
अध्यक्ष डॉ प्रमोद हणमगोंड यांनी स्वागत केले. सागर वाघमारे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.