भोई गल्ली येथे श्री महालक्ष्मी जत्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जागृत महालक्ष्मी मंदिरात दिनांक 31 जानेवारी ते 30 फेब्रुवारी दरम्यान श्री महालक्ष्मी देवीची जत्रा भरणार आहे त्यानिमित्त मंदिरात अभिषेक मंगल आरती करून या जत्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे.
तसेच या कालावधीत जत्रा कमिटीच्या वतीने भजन कीर्तन नृत्य अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी पाच वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रेकरिता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.