अयोध्या नगरमधील श्री अयोध्या महिला व सहाय्य संघाच्या वतीने हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ मोठा उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मनीषाताई अनिल बेनके उपस्थित होत्या.
यावेळी त्यांचे स्वागत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना मनीषाताई बेनके यांनी महिलांना हळदी कुंकू चे महत्व सांगितले. आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे यावे, समाजकार्य करावे त्याचबरोबर चूल आणि मूल न करता आपल्यातील कलागुण सोडून त्यांना वाव द्यावा.
तसेच स्वतः स्वावलंबी बनावे असे सांगून हळदी कुंकू चे महत्व विषद केले. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी महिलांना हळदीकुंकू तिळगुळ आणि वाण देऊन हा तिळगुळ समारंभ उत्साहात पार पाडला. यावेळी मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.