बेळगांव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय आणि ज्योती महाविद्यालय कॅम्प बेळगाव आणि ज्योती इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स फोरम आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आर्थिक बजेट प्रात्यक्षिक लाईव्ह दर्शन अभ्यासक्रम याचा महत्वाचा भाग अर्थशास्त्र या विषयात येतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमात आहे त्या दृष्टिकोनातून बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी महाविद्यालयातील मारुती काकतकर जिमखाना सभागृहात आर्थिक बजेट समूह माध्यमाच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
महाविद्यालयामध्ये गेल्या 2016 पासून भारताचा आर्थिक बजेट व्यवहार संकल्पना मांडणी विद्यार्थ्यांना कळावी या दृष्टिकोनातून लोकसभेत मांडत असणारे बजेट महाविद्यालयात प्रात्यक्षिक रित्या दाखवण्यात आजपर्यंत चालू आहे. आर्थिक बजेट संकल्पना बजेट विक म्हणून संबोधले जाते. याचे ज्ञान वेळोवेळी व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना आणि समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी आर्थिक साक्षरता होणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी वेळोवेळी संकल्पना बजेटची समजावी या हेतूने विद्यार्थ्यांना दाखवण्यात येते बजेट संकल्पना काय आहे याची सविस्तर माहिती एखाद्या कॉमर्स विभागातील तज्ञ व्यक्तीला आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगल्भ असणारे तज्ञ व्यक्ती यांच्यामार्फत विशेष व्याख्यान आयोजन करून एक शैक्षणिक भाग म्हणून आर्थिक ज्ञानाचे माहिती दिली जाते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन पाटील , प्राचार्य आर. डी . शेलार , , प्राचार्य. डॉ. बसवराज कोळूचे, स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे विभाप्रमुख आणि कॉमर्स फोरमचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्हि. शिंदे यांनी केले. प्रा. एस. एस. पाटील, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. निलेश शिंदे, प्रा. अमित ढेकोळकर, प्रा. योगेश मुतगेकर, प्रा. डॉ. सुनिल ताटे, प्रा. दिलिप वाडेकर, प्रा.सूरज पाटील.यासह व्यवस्थापक मंडळाचे कार्यकारी सदस्य कर्मचारी प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खुल्या गटात आर्थिक बजेटवर ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन : मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन