कणकुंबी श्री माउली देवीच्या यात्रोत्सवाला ८ फेब्रुवारीपासून उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बेळगावातून यात्रा विशेष बससेवा सुरू केली आहे. या बससेवेला प्रतिसाद मिळत आहे.
दैनंदिन पाच बसेस बेळगाव- इतर ठिकाणांहून भक्त दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, प्रवाशांसाठी बेळगाव – कणकुंबी मार्गावर यात्रा कणकुंबी मार्गावर धावू लागल्या आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवहनने विविध यात्रा-जत्रांसाठी अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे.
यात्रा – जत्रांतून परिवहनला समाधानकारक महसूल मिळत असतो. त्यामुळे यात्राकाळात जादा बस सोडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कणकुंबी माउली यात्रेसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंदगड आणि विशेष बस धावू लागली आहे



