किल्ल्याजवळील भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स येथे एम.कॉम. च्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स डे आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून मृणालिनी. इंग्लिश अकॅडमीच्या कोमल कोळ्ळीमठ उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहा, उद्दिष्ट निश्चित करा, केवळ नियोजन करू नका तर कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करा. कारण हे जग कृतिशीलतेवर विश्वास ठेवते, असे सांगितले.
प्राचार्या सुनीता देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण होण्याचा सल्ला दिला. समन्वयक नीता गंगारेड्डी यांनी स्वागत केले. अक्षता पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. भारती मुचंडी यांनी सूत्रसंचालन केले. इफ्तिसम बाळेकुंद्री यांनी आभार मानले



