शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात चोरट्यांनी चोरी करून येथील अंदाजे 65 हजार रुपयांचे किमतीचे साहित्य लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.
काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी असलेले वॉचमन आणि पुजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलेच ही बाब एडवोकेट अमर येळ्ळूरकर यांना कळविली.
चोरट्यांनी येथील मंदिरात खिडकीद्वारे शिरून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला असल्याने त्यांनी मंदिरातील पितळी गंगाळ दोन इन्व्हर्टर आणि लोखंडी दरवाजा असा एकूण 65 हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले आहे.
याप्रकरणी कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट अमर येळूरकर यांनी माळ मारुती पोलिसांकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.



