शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर ट्रकने लष्कराच्या एका जिप्सी जीपला ठोकरल्याची घटना आज सोमवारी सकाळी 11:45 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. अपघात कसा झाला याचे नेमके कारण तात्काळ समजू शकले नसले तरी लष्कराची जिप्सी जीप ठोकरलेल्या अवस्थेत ट्रक समोर उभी असल्याचे पहावयास मिळाले. सिव्हिल हॉस्पिटल रोडवर कोल्हापूर सर्कलच्या अलीकडे नव्याने झालेल्या रेड पोलो हॉटेल नजीक हा अपघात घडला. सदर अपघातात कोणालाही इजा झाली नसली तरी लष्कराच्या जिप्सीचे नुकसान झाले आहे. अपघात घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केल्याचे समजते.
लष्कराच्या जीपला ट्रकची ठोकर; चालकाने केला पोबारा
By Akshata Naik

Must read
Next articleचलवेनहट्टी शिवजयंती उत्साहात