शहापूर प्रभाग क्र. 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी काल पणजी -गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना बेळगाव येथील एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या लोकमान्य मातृभूमी पुरस्कार -2023 चा वितरण सोहळा काल रविवारी मंगळवारी पणजीच्या आझाद मैदानावर पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने नगरसेवक रवी साळुंखे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांनी बेळगाव येथे येत्या महिन्याभरात होणाऱ्या एका कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री सावंत यांना दिली. तसेच त्या कार्यक्रमास आपण आवर्जून आपली सन्माननीय उपस्थिती दर्शवावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बेळगावातील कार्यक्रमाचे नगरसेवक साळुंखे यांनी दिलेले निमंत्रण मान्य करून संबंधित कार्यक्रमाला अवश्य हजर राहू, असे आश्वासन दिले.
