भारतीय
कम्युनिस्ट पक्ष व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने मंगळवार दि. 21 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य भालचंद्र कांगो यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. नागेश सातेरी, अनिल आजगावकर, प्रा. आनंद मेणसे व कॄष्णा शहापूरकर यांनी केले आहे.