बेळगाव प्रतिनिधी
आपल्याला आपला दवाखाना स्थलांतरित करण्याच्या उद्देशाने गुंडांकडून खंडणी मागण्यात आली .याप्रकरणी टिळकवाडी पोलिसात तक्रार देण्यास गेले असता याची दखल देखील घेण्यात आली नाही .त्यामुळे सामान्य माणसांसाठी न्याय आहे की नाही? अशी विचारणा डॉक्टर रुपेश साळुंखे यांनी केली आहे .आपल्यावरील अन्यायाच्या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आरपीडी कॉर्नर येथील डॉ. रुपेश साळुंखे यांच्या अत्रीवरद मल्टी स्पेशलिटी आयुर्वेद सेंटर येथे काही अज्ञातांनी हॉस्पिटल मधील यंत्रसामग्रीची मोठी लूट केली असल्याची घटना 31 जानेवारी रोजी उघडकीस आली होती.. सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली होती. मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञातांनी ट्रकमध्ये भरून हॉस्पिटलच्या समग्रीची लूट केली आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचारासाठी लागणारी सुवर्ण युक्त किमती औषधे , गोळ्या आणि वैद्यकीय पुस्तके यांची लूट झाली आहे.अशी डॉ. रुपेश साळुंखे यांची तक्रार आहे. त्यांनी याबाबत माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, सोमवारी मध्यरात्री काहीजणांनी दवाखान्यातील हॉस्पिटल मधील यंत्रसामुग्री आणि काही किमती चीज वस्तू उचलून नेल्या आहेत.याची एकूण अंदाजे किंमत 25 लाख इतकी होते. सदर ट्रकचा तपशील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यामध्ये आकाश रोडलाईन्सचा ट्रक क्रमांक टाटा एलपीटी के. ए 22 डी 9077 असा असल्याचे डॉ. साळुंखे यांनी नोंदविले आहे. सदर घटनेचा योग्य तपशील घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.