बेळगाव ( रवींद्र पाटील ) – मूळचे बेळगाव येथील श्री ठाणेदार सध्या कायमस्वरूपी अमेरिका येथे वास्तव्याला असलेले अमेरिकन व्यापारी , लेखक व राजकारणी म्हणून अमेरिका सरकारचे खासदार हे भरतीय वंशाचे पहिले मराठी खासदार होण्याचा मान मिळवला ते दि. 23 फेब्रुवरी बेळगाव रोजी नागरी सत्कार सोहळा मराठा मंदिर यांच्यावतीने मराठा मंदिर येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला आहे .
डॉ. श्री शामल ठाणेदार यांचा जन्म बेळगाव येथे झाला आणि त्यांनी बी.एससी. 1973 मध्ये GSS कॉलेजमधून रसायनशास्त्रात. त्यांनी अक्रॉन यूएसए विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच.डी मिळवली, यूएसएमध्ये रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि अनेक रासायनिक आणि औषधनिर्माण सेवा व्यवसाय सुरू केले. 1999, 2007 आणि 2016 मध्ये त्यांनी अर्न्स्ट आणि यंग कडून “वर्षातील उद्योजक” पुरस्कार जिंकला.
2020 मध्ये त्यांनी मिशिगन राज्य प्रतिनिधी (आमदार) म्हणून निवडणूक जिंकली आणि 2022 मध्ये यूएसए काँग्रेसमन (खासदार, एमपी) म्हणून निवडणूक जिंकली. ते यूएसए मधील पहिले मराठी आणि पाचवे भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य आहेत. सर्वांसाठी चांगले शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे.
बेळगाव नगरीचे हे भूषण असून बेळगाव शहराच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी बेळगाव शहराती विविध संस्था , संघटना , महिला मंडळे , शिक्षण व उद्योगक्षेत्रातून सत्कार करण्यात येणार आहे .
या सत्कार सोहळ्याला बेळगावकरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे . सत्कारमूर्ती श्री ठाणेदार यांचा सत्कार करण्यासाठी आप्पासाहेब गुरव रवी पाटील – फोन नं. 9591929325 यांच्याशी संपर्क साधावा .